Dighi : किरकोळ कारणावरून दोन तरुणांना मारहाण; पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रूम पार्टनर सोबत भांडण झाल्याने रूम पार्टनरच्या पाच साथीदारांनी तरुणाला आणि त्याच्या भावाला मारहाण केली. यामध्ये दोघे तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 20) रात्री एकच्या सुमारास महादेव नगर दिघी येथे घडली.

याप्रकरणी अमोल एकनाथ खामकर (वय 26, रा. महादेवनगर दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सनी सुभाष सरपाले (वय 21), रोहित ओमप्रकाश बोरडे (वय 28), संदीप पोपट लोखंडे (वय 33), विकास नवनाथ साळवे (वय 23) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल खामकर आणि रवी जाधव हे दोघेजण एका खोलीत राहतात. मागील काही दिवसांपूर्वी दोघांचे भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून रवी जाधवच्या मित्रांनी गुरुवारी रात्री अमोल आणि त्याच्या भावाला मारहाण केली. आरोपींनी अमोलच्या डाव्या खांद्यावर चाकूने वार केला. यामध्ये अमोल आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.