Pune : पुणे महापालिका आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आणि टेक्सास ऑस्टिन,अमेरिका ह्यांच्यातील झालेल्या सिस्टर सिटी इंटरनॅशनल करारावर आणि त्याला धरून पुढे 2020 मध्ये एकत्रित रित्या कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन करता येईल या विषयांवर चर्चा झाली.

यावेळी पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, सभासद अजय खेडेकर  आणि आनन्द रिठे यांच्या बरोबर पुणे महानगरपालिकेमध्ये चर्चा झाली. यावेळी ऑस्टिनमधून शुभदा सक्सेना, मेघा उप्पल, ह्याना फ्रांकेल आणि टीसीएस चे व्हाईस प्रेसिडेंट दिनानाथ खोलकर, संयोजक वैशाली पाटकर, IEEE पुणे सेक्शनचे जगदीश चौधरी, विश्वकल्याण गुरुकुलचे सत्यजित जोगळेकर, अमृता देवगावकर, परसिस्टंटचे समीर देशपांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.