Talegaon Dabhade : आदिवासी कुटूंबातील महिलांना दिवाळी फराळ वाटप

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे  येथील विरांगना महिला विकास संस्थेच्या वतीने राजमाची येथील आदिवासी कुटूंबातील महिलांना दिवाळी सणाच्या निमित्ताने दिवाळी फराळ आणि साड्यांचे वाटप करण्यात आले. 

विरांगना महिला विकास संस्था ही महिलांच्या विकासासाठी काम करणारी संस्था आहे. महिलांना वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय उभा करून देण्यासाठी ही संस्था कार्यरत असते. कोरोना लाॅकडाऊनमध्ये आर्थिक कंबरडे मोडलेल्या आणि नंतर झालेल्या निसर्ग चक्री वादळाचा तडाखा सहन केलेल्या राजमाची गावातील आदिवासी महिलांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने विरांगना संस्थेच्या वतीने राजमाची गावात सदर कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी संस्थेच्या मुख्य प्रवर्तक  निलिमा  दाभाडे, सदस्या रजनी ठाकूर, शैलजा काळोखे, सविता गावडे, विना दाभाडे, नेहा गराडे, सोनाली शेलार, ज्योती दाभाडे  तसेच राजमाची गावच्या सरपंच प्रगती वरे, ग्रामपंचायत सदस्या दीपिका उंबरे यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.