Vadgaon Maval : प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

एमपीसी न्यूज : वडगाव ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य स्वर्गीय सुधीर (अण्णा) वहिले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त वहिले परिवाराकडून सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

यावेळी उपनगराध्यक्षा पूजा वहिले, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष अतुल राऊत, माजी उपसरपंच विशाल वहिले, उद्योजक श्रीकांत भरणे,  दिलीप काळे,  ॲड अजित वहिले,  सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत, दिग्विजय काळे आदी उपस्थित होते.

मंगळवार (दि 27) स्व. सुधीर वहिले यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन होता. त्यानिमित्ताने मावळ तालुक्यातील अहिरवडे येथील किनारा वृध्दाश्रमात जाऊन 45 नागरीकांना तेल, गहू, तांदुळ, कपडे, हॅन्डवाॅश, फिनेल अशा जीवनावश्यक वस्तुचे वहिले परिवार व मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

सुधीर (अण्णा) वहिले हे वडगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त वृध्दांची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविन्यात आला.

 या प्रसंगी माजी उपसरपंच विशाल वहिले म्हणाले, आपण समाज प्रति देणे लागत असतो, स्व. सुधीर वहिले यांचा प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्ताने वृध्दांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आनंद झाल्याचे वहिले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.