Talegaon Dabhade : संतोष भेगडे यांच्या वतीने 1142 नागरिकांना मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप

एमपीसी न्यूज – पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य, नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासचे (स्मार्ट कार्ड) मोफत वाटप करण्यात आले. याचा 1142 नागरिकांनी लाभ घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी काही बंधने आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोरोना लसीचे दोन डोस झाले असेल तरच प्रवेश आहे. यासाठी शासनाने नागरिकांना युनिव्हर्सल पास काढण्यास सांगितले आहे. युनिव्हर्सल पास मध्ये व्यक्तीचा फोटो, लसीकरणाचे दोन्ही डोस झालेली माहिती असते. दोन्ही डोस झालेले प्रमाणपत्र सोबत बाळगणे शक्य नसल्याने नागरिकांच्या सोयीसाठी संतोष भेगडे यांनी युनिव्हर्सल पास ही योजना राबविली आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून संतोष भेगडे यांच्या वतीने शुक्रवार (दि. 18) पासून मोफत युनिव्हर्सल पास (स्मार्ट कार्ड) काढून दिले जात आहे. आतापर्यंत 1142 नागरिकांनी युनिव्हर्सल पास काढला आहे. अजूनही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद येत आहे. ही योजना 5 मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. यासाठी नागरिकांनी श्री. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था, गणपती चौक, तळेगाव दाभाडे येथे दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन संतोष भेगडे यांनी केले आहे.

युनिव्हर्सल पास काढण्यासाठी कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस होऊन 14 दिवस झाल्यावर युनिव्हर्सल पास काढता येतो तसेच लसीकरण करताना रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.