Dehugaon : विहिरीत पडलेल्या श्वानास वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान

एमपीसी न्यूज – देहुगाव- झेंडेमाला येथे खोल विहिरीत पडलेल्या श्वानास मावळ येथील वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान दिले. 

देहुगाव परिसरातील रहिवासी रवी काळोखे यांनी भटकी कुत्री मागे लागल्यामुळे बचाव करताना एक श्वान विहिरीमध्ये पडले आहे, अशी माहिती नयन कदम यांना दिली.

माहिती मिळताच वन्यजीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे, नयन कदम, प्रथमेश मुंगीकर, निनाद काकडे, सूरज शिंदे व निखिल सुपेकर हे घटना स्थळी पोहचले व मोठ्या शिताफीने त्या भेदरलेल्या श्वानास सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. त्याला बाहेर काढण्यासाठी निलेश गराडे हे 40 फूट खोल विहिरीत उतरले व त्या श्वानास एका बकेटमध्ये ठेवून वर ओढून घेण्यात आले. श्वानाची प्रकृती उत्तम असल्याने त्याला तत्काळ विहिरीपासून लांब मुक्त करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.