Pimpri News : घरेलू कामगारांना सन्मानधनासाठी वयाची अट 50 ते 60 करावी

घरेलू कामगारांची कामगार उप आयुक्त अभय गीते यांच्याकडे  मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धनासाठी वयाची अट 55 व दहा हजार रुपये लाभ मिळवण्यासाठी  दोन वर्षाची पावतीची अट असल्यामुळे यात घरेलू कामगार लाभ घेऊच शकणार नाहीत. (Pimpri News) म्हणून वयाची अट 50 ते 60 करावी. दोन वर्षाची पावती अट नसावी ,या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एक ते दोन महिन्याची मुदत वाढ द्यावी यासाठी कामगार मंत्री व घरेलू कामगारांनी आज कामगार उपायुक्त अभय गीते यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली.

राज्य घरेलू कामगार समन्वय समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या  शिष्टमंडळात कामगार नेते काशिनाथ नखाते,  माधुरी जलमुलवार, आनंद आधार संघटनेच्या  अनिता गोरे, लक्ष्मी जाधव, महेंद्र जैनजांगडे, शेनाज शेख, कौशल्या इजगज, कविता नाईक, महादेव गायकवाड आदी उपस्थित होते.

 

Pune : वारुळवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करावे – पालकमंत्री

महाराष्ट्र शासनाच्या घरेलू कामगार कल्याण मंडळ  अन्वये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 2011  पासून अस्तित्वात असलेल्या घरेलू कामगार यांना  निर्णयानुसार वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत व मागील दोन वर्षे नोंदणी जीवित असलेल्या पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन  दहा  हजार रुपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे . यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनासह पाठपुरावा केलेला होता. या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत.  मात्र यापूर्वी अनेक वेळा वयाची अट ही 50 ते 60 वर्षे असावे अशी मागणी अनेक वेळा करण्यात आलेली होती.

तसेच कोरोना कालावधीमध्ये ज्याप्रमाणे घरेलू कामगारांना 1500  रुपये अर्थ सहाय्य लाभ देण्यात आला. त्यावेळी नूतनीकरणाची अट शिथिल करण्यात आली  होती. तशीच  नूतनीकरणाची अट या योजनेस  शिथील करून  सन्मानधान योजनेचा लाभ द्यावा. (Pimpri News) तसेच आपल्याकडून जाहीर करण्यात आले होते की 31 मार्च 2023 पर्यंत  कामगारांनी विहित नमुन्यातील अर्ज करून, कागदपत्रे जोडून याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन आपण केलेले होते.  हा कालावधी अत्यंत  अल्प असून या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यातील कामगारांचे अर्ज भरले जाणे शक्य होणार नाही म्हणून एप्रिल  ते मे अखेरपर्यंत याची मुदतवाढ करून द्यावी अशी मागणी आज केली आहे. यावर शासनाला  पत्र पाठवून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन कामगार उपायुक्त यांनी दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.