President Election : द्रौपदी मुर्मू पहिल्या फेरीत आघाडीवर

एमपीसी न्यूज – देशाला आज थोड्याचवेळात नवे राष्ट्रपती (President Election) मिळणार आहेत. सकाळी आकरा वाजल्यापासून संसद भवनात मत मोजणीला सुरुवात झाली आहे.राष्ट्रपती पदासाठी 18 जुलैला मतदान झाले होते.

 

 

या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे द्रौपदी मुर्मू यांनी तर युपीएकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू (President Election) या आघाडीवर असून त्यांना 540  तर यशवंत सिन्हा यांना 208  मते मिळाली आहेत. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल आहेत. तसेच त्या आदिवासी समाजातून येत आहेत. मुर्मु यांच्या रुपाने भारताला पहिल्यांदाच एक आदिवासी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळणार आहे.

 

PCMC News: महापालिका मेडिकल कॉलेज सुरू करणार

 

द्रौपदी मुर्मू यांच्या गावात जल्लोष सुरु

द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे निकाल लागायच्या आधीच मुर्मू यांच्या गावातील घरासमोर उत्साह पहायला मिळत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.