Crime News : एमएसईबीचे बिल पेमेन्ट अपडेटच्या नावाखाली 2.60 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज –  एमएसईबीचे बिल पेमेन्ट अपडेटच्या नावाखाली 2.60 लाख रुपयांची एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. याबाबत 74 वर्षीय अनिल भावसार, रा. पिंपरी (Crime News) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

याप्रकरणी अज्ञात एमएसईबी बिल अपडेट ऑफिसरच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(क)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जुलैला अज्ञात एमएसईबी बिल अपडेट ऑफिसर यांनी फिर्यादी (Crime News) यांच्या मोबाईलवर मेसेज करून सांगितले की तुमचे राहत्या घरातील एमएसईबी मीटरचे पेमेंट अपडेट करावे,  तुम्ही पेमेंट त्वरित अपडेट न केल्यास तुमची लाईट आज रात्री 9 पर्यंत बंद करण्यात येईल.

 

 

 

तसेच त्यासाठी क्किव सपोर्ट ऍप्प डाउनलोड करण्यासाठी सांगून 10 रुपये अपडेटेशन चार्जेस नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनेक ओटीपी आले. ते फिर्यादी यांनी कोणाला शेअर केले नसताना फिर्यादी यांची पत्नी भरती हिचे ऍक्सिस बँक खात्यावरून पेटिएमद्वारे 60 हजार (Crime News)  रुपये, 1 लाख रुपये व पुन्हा 1 लाख रुपये अशी एकुण 2.60 लाख रुपये ऑटोमॅटिक ऑनलाईन ट्रान्सफर झालेले दिसले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.