MP Srirang Barane : खासदार श्रीरंग बारणे उद्या मतदारसंघात येणार; विमानतळावर जंगी स्वागताची कार्यकर्त्यांची तयारी

एमपीसी न्यूज – दिल्लीत घडलेल्या घडामोडीनंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे उद्या (शुक्रवारी) प्रथमच मतदारसंघात येत आहेत. त्यापार्श्वभूमीर कार्यकर्त्यांनी खासदार बारणे (MP Srirang Barane)  यांच्या जंगी स्वागताची तयारी केली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पुणे विमानतळावर कार्यकर्त्यांकडून खासदार बारणे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याचे समजते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 12 खासदार गेले आहेत. या 12 खासदारांनी लोकसभेतील शिवसेनेचा गटनेता बदलला आहे.  मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीला खासदार श्रीरंग बारणे यांनीही पाठिंबा (MP Srirang Barane) दिला आहे. दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्यामुळे दिल्लीत असलेले खासदार श्रीरंग बारणे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रथमच मतदारसंघात येत आहेत. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्याचे कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे.

President Election : द्रौपदी मुर्मू पहिल्या फेरीत आघाडीवर

 

 

खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत 25 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले. सलग दुस-यांदा खासदार आहेत. खासदार बारणे यांचा मोठा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची फळी आहे. जनमानसात मिसळणारा खासदार अशी त्यांची मतदारसंघात ख्याती आहे. मतदारसंघात त्यांना मानणारे मोठ्या संख्येने कार्यकर्ते, मतदारवर्ग आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून ते समाजकारण, राजकारणात आहेत. पवार घराण्याविरोधात लढणारा व्यक्ती म्हणूनही खासदार बारणे यांची राज्यभरात ओळख आहे.

मावळ मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पवार घराण्यातील पार्थ पवार उभे होते. पवार घराण्याने पूर्ण ताकद लावली होती. परंतु, त्यांच्यासमोर लढून खासदार बारणे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. लोकसभेला शिवसेना-भाजपची युती होती. मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचा मोठा जनाधार आहे. युतीतून निवडून आल्याने मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असतानाही खासदार बारणे यांनी भाजपसोबत सलोख्याचे संबंध ठेवले. भाजप कार्यकर्ते दुखावू दिले नाहीत.

 

 

भाजपनेही मला मतदान केले असल्याचे खासदार बारणे हे जाहीरपणे सांगत होते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही दुखावणार नाहीत, याची त्यांनी कटाक्षने खबरदारी घेतली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनाही खासदार बारणे यांच्याबाबत आपुलकी आहे. त्याचा फायदा खासदार बारणे यांना आगामी काळात होईल. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल हा मोठा शहरी भाग येतो. या मतदारसंघात भाजपला मानणारा मोठा मतदार आहे. खासदार बारणे यांची व्यक्तिगत ताकद आहे. दिल्लीत घडलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे  (MP Srirang Barane)  उद्या मतदारसंघात येत असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करण्याची तयारी केली असल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.