Wakad News : अतिक्रमणामुळे सोसायटीतील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला करावे लागले द्रविडी प्राणायाम

एमपीसी न्यूज – वाकड येथील एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये आग लागली , आग विझवण्यासाठी वेळेवर अग्निशमनदलाची गाडी वेळेवर आली देखील मात्र हीच आग विझवायला तब्बल अर्धा ते पाऊण तास लागला, कारण सोसायटीमध्ये अग्निशमनदलाची गाडी अतिक्रमणामुळे सोसायटीच्या गेटवरच अडकून पडली होती. हा सारा प्रकार वाकड येथील पलाश सोसायटी मध्ये शुक्रवारी (दि.9) रात्री घडली.

पलाश सोसायटी जवळ एक जुनी विहीर आहे जी मागील दहा वर्षापासून काढण्यात यावी अशी मागणी तेथील स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच तेथे रस्त्याच्या मधोमध एक गॅरेज देखील आहे.यामुळे वेळेत अग्निशमनदलाची गाडी पोहचून पण केवळ मधोमध असणारे अतिक्रमण व विहीर यामुळे गाडी वळून सोसायटीमध्ये जाणे शक्य नव्हते. अखेर गाडी अथक प्रयत्नानंतर ही सोसायटीच्या गेटवरच थांबली . शेवटी अग्निशमनदलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने पाईप व इतर साहित्य नेत अखेर ती आग विझवली.

Pimpri News: बैलगाडा शर्यत लढा, ‘‘रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल्स रिपोर्ट’’ निर्णायक ठरेल – महेश लांडगे

यावेळी मात्र स्थानिक नागरिकांनी अशा परिस्थीत कोणाछ्या जिवाचे बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण असा स्वाल उपस्थित केला. जूनी विहीर व अतिक्रमणाबाबत नागरिकांनी पिंपरी-चिंचवड माहापालिकेला लेखी तक्रार दिली आहे तरी कोणतीही उपाययोजना महापालिकेने केलेली नाही. स्थानिक राजकिय नेत्यांनीही निवडणूकीच्या वेळी अवघ्या एक महिन्यात आम्ही हा प्रस्न सोडवू असे आश्वासन दिले होते मात्र तरीही कोणतीच उपाय योजना राजकीय नेते किंवा महापालिकेने केलेली नाही. आग विझवण्यासाठीही यंत्रणांना अतिक्रमणाची अडथळे पार करावे लागत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासान काही बरेवाईट झाल्या नंतरच पाऊले उचलणार का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.