Dapodi : लग्नाची मागणी घातल्यावरून दोन कुटुंबांमध्ये भांडण; परस्पर विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणाने मुलीच्या भावाकडे लग्नाची मागणी घातली. त्यासाठी मुलीच्या भावाने नकार दिला. तसेच जुन्या भांडणाच्या वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार भांडण झाले. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दापोडी येथे शुक्रवारी (दि. 3) रात्री सातच्या सुमारास घडली.

सुनिता राजू गायकवाड (वय 38, रा. दापोडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नितीन उर्फ गोठ्या सुरेश जाधव (वय 19), सुरेश दिगंबर जाधव (वय 40), लक्ष्मण सुरेश जाधव (वय 20), अर्जुन दिगंबर जाधव (वय 30, सर्व रा. दापोडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनीता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी नितीन याने सुनिता यांच्या मुलीला त्यांच्या मुलाकडे मागणी घातली. त्यासाठी सुनीता यांच्या मुलाने त्यास नकार देत ‘तू इथून जा  नाही तर मी पोलिसात तुझी तक्रार करेल’ असे म्हटले. यावरून सर्व आरोपींनी सुनिता यांच्या पतीस व मुलास लाकडी दांडक्याने मारहाण केली. याच्या परस्पर विरोधात सुरेश दिगंबर जाधव (वय 37) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार राजू अण्णा गायकवाड (वय  46), आकाश राजू गायकवाड (वय 18), राजू यशवंत दांडे (वय 50), सचिन राजू दांडे (वय 22) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश यांच्या मुलाने आरोपी राजू यांच्या मुलीस लग्नाची मागणी घातली. त्यासाठी आरोपींनी सुरेश यांच्या मुलाला नकार दिला. तसेच आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना मारहाण केली. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.