Pune : वेबसाईटवरून लग्नाचे आमीष दाखवून महिलेची नऊ लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – वेबसाईटवरून लग्नाचे आमीष दाखवून एका 35 वर्षीय महिलेची नऊ लाख रुपयांना फसवणूक केली. ही घटना 23 ऑक्टोबर 2018 ते 15 नोव्हेंबर 2018 या काळात घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपींकडून वेबसाईटवरून लग्न करण्याचे आमिष दाखविले. महिलेसोबत व्हॉट्स अपवर संपर्क वाढविला. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने अन्य दोन मित्रांच्या मदतीने अकाऊंटमध्ये महिलेकडून 9 लाख दोन हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.