Pimpri News : दुर्गा ब्रिगेड, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने कोकण पूरग्रस्तांना मदत 

एमपीसी न्यूज – दुर्गा ब्रिगेड संघटना आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने कोकण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि दुर्गा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा दुर्गा भोर यांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

दुर्गा ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्त्यांनी कोकणात जाऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. पुढील काळातही कोकण भागातील शाळा, वसतिगृह व पडलेली घरे यासाठी दुर्गा ब्रिगेडच्या वतीने सहकार्य केले जाईल असे, दुर्गा ब्रिगेडच्या आपत्कालीन विभागाद्वारे सांगितले आहे.

याप्रसंगी दुर्गा ब्रिगेडच्या कार्यकर्ते सुवर्णा शिंदे, गौरी सपकाळ, उमेश चव्हाण, शिवाजी भरगुडे, सुनील शिंदे यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.