Economics of Ganeshotsav: अर्थकारण गणेशोत्सवाचे!

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरात दरवर्षी सुमारे 850 कोटीं रुपयांची उलाढाल होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा खर्च 80 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, मात्र गणेशोत्सवावर वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असणाऱ्यांचे काय?…. वाचा, पुण्यातील गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांचा विशेष लेख…

——————————————————————–

 गणेशोत्सवाचे अर्थकारण

लेखक – आनंद सराफ

प्रत्यक्ष प्रवाहात समरस होऊन, उत्सवाचे अर्थकारण जाणून घेताना, उद्बोधक माहिती मिळत गेली. पूजेचे तबक, त्यातील  साहित्य आणि मंडप ही एकात्मतेची प्रतीकेच आहेत. मूर्तीसाठी शाडू, प्लास्टर हे गुजरात कच्छ भागातून येते.

रंग मुंबईमधे तयार होतात तर कारागीर हे प्राधान्यानेे पेण, अहमदनगर, कोल्हापूर भागातील आहेत. हळदी-कुंकवाची पेव उत्तर प्रदेशात तर नारळ तांदूळ दक्षिणेकडून अधिकतर येत असतात. पूजेचे पाट, मखरे, राजस्थानचे कलाकार बनतात.

गणेशचरणी हार फुले अर्पण होण्यासाठी, शेतकरी, वाहतूकदार आंणि सजावटकारांची संघटित मालिका उपयुक्त ठरते. कृत्रीम फुले पंजाब राज्यातून येतात.

मंडपासाठी ताडपत्री पश्चिम बंगाल आणि बांबू वासे, आसाममधून येतात.

या सर्व मानसिक, शारीरिक आणि आर्थिक गुंतवणूकीतून,उत्सवामधे  अप्रत्यक्षरित्या समरसतेची भावना निर्माण होत असते.

अर्थकारणाचा पुणे परिसराचा वेध घेतला तर,चार हजार नोंदणीकृत, तेवढीच इतर संस्था, मंडळे आणी वीसहजाराहून अधिक, मोठ्या गृहनिर्माण संस्थांमधे, गणेशोत्सव, सार्वजनिक स्वरूपात साजरा होतो. यांचा सरासरी प्रत्येकी  किमान खर्च हा दोन लाख रुपये होतो.

शहर परिसरात घरगुती गणपतींची संख्या, पाच लाखाहून अधिक आहे. घरटी दोन हजार रुपये किमान खर्च होतो.ही आकडेवारी गृहित धरली तर पुण्यातील खर्चाचा आकडा, साडेआठशे कोटींपुढे जातो.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे या वर्षीचे अर्थकारण हे एकूणच  ऐंशी टक्के   उतरणार आणि घरगुती उत्सवाचे खर्च हे चाळीस टक्क्याने कमी होणार असे प्रत्यक्ष बाजारपेठेचे अंदाज आहेत.

एकंदरीतच, विघ्नहर्त्या देवाचा हा उत्सव, भक्तांच्या आंणि देशवासियांच्या कसोटीचाच ठरणार आहे हे निश्चितच आहे.

कार्य सिद्धीस नेण्यास, श्री समर्थ आहेत, ही श्रद्धा, याही वेळी तरून नेईल, असा सार्वत्रिक विश्वास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.