Pimpri corona Update: शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 40 हजार पार, 1061 नवीन रुग्ण, 946 जणांना डिस्चार्ज

सध्या 7042 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 40 हजार पार झाली आहे. शहराच्या विविध भागातील 1039 आणि पालिका हद्दीबाहेरील 22 अशा 1061 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) भर पडली.  शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 40 हजार 898 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 946 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये नेहरुनगर (स्त्री 68 वर्षीय), संत तुकारामनगर पिंपरी(पुरुष 89 वर्षीय, स्त्री 75 वर्षीय), मोरेवस्ती चिखली (पुरुष 72 वर्षीय), पुनावळे (पुरुष 40 वर्षीय), चिंचवड (पुरुष 73 वर्षीय), रहाटणी (पुरुष 60 वर्षीय), दापोडी (पुरुष 50 वर्षीय), वाल्हेकरवाडी (पुरुष 60 वर्षीय)‍, पिंपळे सौदागर (पुरुष 65 वर्षीय), पिंपरी (स्त्री 34 वर्षीय), चाकण (पुरुष 60 वर्षीय), कोंढवा (पुरुष 47 वर्षीय) या रुग्णांचा समावेश आहे.

तसेच पुणे पालिका हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण पिंपळे गुरव (पुरुष 70 वर्षीय, स्‍त्री 80 वर्षीय, पुरुष 67 वर्षीय), चिंचवड (पुरुष 84 वर्षीय, स्त्री 70 वर्षीय), काळेवाडी फाटा (पुरुष 63 वर्षीय), निगडी (पुरुष 70 वर्षीय), दिघी (पुरुष 52 वर्षीय), पिंपळेनिलख (स्त्री 63 वर्षीय) येथील रहिवाशी आहेत.

शहरात आजपर्यंत 40 हजार 898 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 27 हजार 166 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 771 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 152 अशा 923 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 7042 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.