Edgbaston Test Match: पावसाच्या व्यत्ययानंतरही भारतीय संघ मजबूत स्थितीत

एजबस्टन कसोटी सामना

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) –  पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतरही एजबस्टन कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.  ऋषभ पंतने रचलेल्या पायावर कळस चढवत आपले तिसरे शतक करणाऱ्या अष्टपैलू रवींद्र जडेजासह कर्णधार बुमराहच्या अष्टपैलू कामगिरीमुळे पाहूणा भारतीय संघ एजबस्टन कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत आलेला आहे.  (Edgbaston Test Match) आज सकाळी भारतीय संघाने कालच्या 7 बाद 338 वरुन पुढे खेळायला सुरुवात करताना आजच्या पहिल्या सत्रात आपलाच वरचष्मा ठेवला आहे.

आजचा दुसऱ्या दिवसाचा खेळ बऱ्याचदा इंग्लिश लहरी पावसामुळे चालू बंद चालू बंद होत होता, मात्र तरीही जेवढा खेळ झाला त्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत या कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे. आजचा दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा इंग्लंड संघाने आपल्या पहिल्या डावात 5 गडी गमावून 84 धावा केल्या आहेत,यजमान संघ अजूनही 332 धावांनी पिछाडीवर आहे.

आज सकाळी भारतीय संघाने कालच्या 7 बाद 338 वरुन पुढे खेळायला सुरुवात करताना आजच्या पहिल्या सत्रात आपलाच वरचष्मा ठेवला. काल 83 धावांवर नाबाद असलेल्या जडेजाने आज आपल्या तिसऱ्या कसोटी शतकाला गवसणी घातली. त्याने 13 चौकार मारत आपल्या शतकाला पूर्ण केले. त्याला कर्णधार बुमराहने जबरदस्त साथ देताना अविश्वसनीय फलंदाजीही केली.

त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा ठोकून नवीन विक्रम आपल्या नावावर केलाआहे. हे कसोटी इतिहासातले सर्वात महागडे षटक ठरले. या जबरदस्त फलंदाजीमुळे भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा करून आपली स्थिती एकदम मजबूत केली.

जडेजा 104 धावा करुन बाद झाला, तर बुमराहने टी-20 पध्दतीने तोडफोड फलंदाजी करत 16 चेंडूत 31 धावा केल्या. इंग्लंड संघातर्फे पुन्हा एकदा जेम्स अँडरसनने जबरदस्त गोलंदाजी करत आणखी एकदा डावात पाच बळी मिळवले. त्याला पॉट्सने 2 बळी मिळवून उत्तम साथ दिली. (Edgbaston Test Match)

 

Chakan News: विमान प्रवासाची बनावट तिकीटे विकून 12 लाखांची फसवणूक

नुकतेच मायदेशी  झालेल्या कसोटी मालिकेत नवीन कर्णधार बेनस्टोकच्या नेतृत्वाखाली  न्यूझीलंड संघाला तीन विरुद्ध शून्य अशा फरकाने दणदणीत पराभव करून मालिका जिंकलेल्या इंग्लिश संघाचा आत्मविश्वास अतिशय बुलंद असा होता.  मात्र बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या रचून त्यांना चांगलाच धडा शिकवला. उत्तरादाखल खेळताना इंग्लंड संघाची सुरूवात अतिशय खराब अशी झाली.

अलेक्स लीस आणि क्रोवली यांनी डावाची सुरुवात केली खरी पण संघाची धावसंख्या फक्त 16 च झाली असताना लीसला बुमराहने वैयक्तिक 6 धावांवर त्रिफळाबाद करुन यजमान संघाला पहिला धक्का दिला. (Edgbaston Test Match) यातून सावरण्याआधीच दुसरा सलामीवीर क्रोवलीलाही बाद करुन चांगलेच अडचणीत आणले.

यानंतर खेळायला आला तो प्रचंड चांगल्या फॉर्मात असलेला आणि केवळ फलंदाजीसाठी नेतृत्व सोडणारा जो रूट. तो खेळायला आला आणि पाठोपाठ पाऊसही आला. या व्यत्ययानंतर खेळ पुन्हा सुरू झाला,तो अगदी थोडाच वेळ चालला आणि पुन्हा पाऊस सुरू झाला.

Ajit Pawar : अजित पवार, छगन भुजबळ कोरोनामुक्त, अधिवेशनासाठी दाखल

त्यामुळे चहापानापर्यंतचा खेळ पावसात वाहून गेला. पण नंतर खेळ पुन्हा सुरू झाला ज्यात भारतीय संघाने जो रूटच्या महत्वपूर्ण विकेटसह इंग्लड संघाचा अर्धा संघ तंबूत वापस पाठवून या कसोटीवर मजबुत पकड मिळवली आहे. आजचा खेळ समाप्त झाला तेंव्हा इंग्लंड संघाचा कर्णधार बेनस्टोक शून्य धावावर तर जॉनी बेअरस्टो 19 धावा करुन नाबाद आहेत.

भारतीय संघातर्फे कर्णधार बुमराहने  35 धावा देत तीन महत्वपूर्ण बळी मिळवले तर त्याला शमी आणि सिराजने एकेक गडी बाद करत जबरदस्त साथ दिली. इंग्लंड संघाकडून जो रूटने सर्वाधिक 31 धावा काढल्या, त्याची महत्वपूर्ण विकेट मोहम्मद सिराजने मिळवली.

या कसोटी सामन्याचा आजचा दुसराच दिवस असून यजमान इंग्लंड संघ या कसोटीत पहिल्या डावात अजूनही 332 धावांनी मागे आहे,त्यांचे पाच गडी बाद झालेले असल्याने भारतीय संघाला आज तरी मोठी आघाडी खुणावत आहे. अर्थात इंग्लड संघासाठी मात्र कर्णधार बेनस्टोक आणि जॉनी बेअरस्टो हे दोन्हीही खमके फलंदाज बाकी असल्याने त्यांच्याची गटात या जोडीकडून जोरदार लढतीची अपेक्षा आहे.

कसोटी क्रिकेटचे हेच वैशिष्ट्य आहे की, यात प्रत्येक दिवशी खेळ आणि निकाल बदलत राहतो. उद्या भारतीय संघ इंग्लंड संघाचा डाव लवकर गुंडाळू शकला तर या कसोटीत आणखीन मजबूत अवस्थेत येवू शकतो. तर याचवेळी इंग्लिश उर्वरित फलंदाजांनी चांगला प्रतिकार केला तर इंग्लंड संघही ..नाही का?

अभी तो काफी कुछ बाकी है इस टेस्ट मे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.