Nigdi : पूर्ववैमनस्यातून पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघांनी घरामध्ये पेट्रोल टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 22) मध्यरात्री एकच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली.

एकनाथ बबन कुसाळकर (वय 50, रा.ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार युवराज बाबुराव शेलार (वय 50), राहुल युवराज शेलार (वय 27), बिभीषण बाबुराव शेलार (वय 55), किरण बिभीषण शेलार (वय 30, सर्व रा.दत्तनगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसाळकर यांचे आरोपींसोबत मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. सोमवारी ते आणि त्यांचा मुलगा रितेश घरात झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कुसाळकर यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी कुसाळकर यांच्या घराच्या दरवाजाच्या फटीतून पेट्रोल टाकून आग लावली. यामध्ये घराचा दरवाजा अर्धा जळून खाक झाला. कुसाळकर यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a8d0f7dd7f2a48',t:'MTcxNDE1ODAzNC45MjYwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();