Pune : तीन एक्सप्रेसमध्ये हंगामी डब्यांची वाढ

एमपीसी न्यूज – तीन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये प्रत्येकी एका डब्याची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मर्यादित कालावधी पर्यंत असणार आहे. पुणे-जम्मूतावी-पुणे (झेलम एक्सप्रेस), पुणे-हावडा-पुणे (झेलम एक्सप्रेस) आणि पुणे-पटणा-पुणे एक्सप्रेस या गाड्यांच्या डब्यात वाढ करण्यात आली आहे. दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वेच्या प्रवाशांमध्ये वाढ होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे-जम्मूतावी (गाडी क्रमांक 11077) या एक्सप्रेसला एक थ्री टायर एसी कोच 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीसाठी तर जम्मूतावी-पुणे (गाडी क्रमांक 11078) या एक्सप्रेसला एक थ्री टायर एसी कोच 3 नोव्हेंबर 2018 ते 2 जानेवारी 2019 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

पुणे-हावडा (गाडी क्रमांक 12129) या एक्सप्रेसला एक जनरल कोच 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीसाठी तर हावडा-पुणे (गाडी क्रमांक 12130) या एक्सप्रेसला एक जनरल कोच 3 नोव्हेंबर 2018 ते 2 जानेवारी 2019 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

पुणे-पटणा (गाडी क्रमांक 12149) या एक्सप्रेसला एक जनरल कोच 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीसाठी तर पटणा-पुणे (गाडी क्रमांक 12150) या एक्सप्रेसला एक जनरल कोच 3 नोव्हेंबर 2018 ते 2 जानेवारी 2019 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.