Alandi : आळंदीमध्ये 7 ते 12 जूनपर्यंत वाहनांना प्रवेश बंदी

वारकऱ्यांच्या व अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या वाहनांना फक्त प्रवेश

एमपीसी न्यूज : आळंदीत 11 जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Alandi) यांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार असून दुसऱ्या दिवशी 12 जून रोजी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा 6 जून ते 12 जून दरम्यान संपन्न होणार आहे. या उत्सवासाठी राज्यासह परराज्यातून सुमारे 4 ते 5 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या काळात आळंदी व परिसरामध्ये रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे 7 जून ते 12 जूनपर्यंत आळंदी शहरामध्ये फक्त वारकऱ्यांच्या व अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार असून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.

Pune : केशवनगर-मुंढवा वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार; जमीनमालकांची जमीन सोडण्याची तयारी

बंद असणारे मार्ग आणि पर्यायी मार्ग –  Alandi 

1. वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग –
पुणे-आळंदी रस्ता (मॅग्झिन चौक येथे नाकाबंदी)

रोड बंद करण्याचे ठिकाण – मॅग्झिन चौक
पर्यायी मार्ग – पुणे -दिघी मॅग्झिन चौक – भोसरी – मोशी – चाकण

2. वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग –
मोशी – देहूफाटा रस्ता (डुडुळगाव जकातनाका येथे नाकाबंदी)

रोड बंद करण्याचे ठिकाण – हवालदार वस्ती
पर्यायी मार्ग – मोशी- चाकण -शिक्रापूर, मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक -दिघी

3. वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग –
चाकण(आळंदी फाटा) – आळंदी रस्ता (इंद्रायणी हॉस्पिटल नाकाबंदी)

रोड बंद करण्याचे ठिकाण – आळंदी फाटा
पर्यायी मार्ग – चाकण – मोशी – मॅग्झिन चौक – दिघी – पुणे (पुणे बाजूकडे जाण्याकरिता), चाकण शिक्रापूर – नगर हायवे पुढे सोलापूर हायवे

वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग –
वडगाव घेनंद (शेलपिंपळगाव फाटा) -आळंदी रस्ता (कोयाळी कमान नाकाबंदी)

रोड बंद करण्याचे ठिकाण – कोयाळी फाटा
पर्यायी मार्ग – वडगांव घेनंद – शेलपिंपळगाव फाटा-चाकण-नाशिक हायवे रोडने पुणे

वाहतुकीस बंद करण्याचे मार्ग –
मरकळ आळंदी रस्ता(पी सी एस कंपनी फाटा नाकाबंदी)

रोड बंद करण्याचे ठिकाण – धानोरे फाटा/पीसीएस चौक फाटा
पर्यायी मार्ग – 1)मरकळ-सोळू-धानोरे- चऱ्होली खुर्द (पीसीएस कंपनी फाटा) बायपास रोडने चऱ्होली बु.पुणे, 2)मरकळ-कोयाळी-वडगांव घेनंद-पिंपळगाव फाटा-चाकण

वाहतुकीस बंद करण्याचा मार्ग –
चिंबळी (चिंबळी फाटा) -आळंदी रस्ता (केळगाव बायपास नाकाबंदी)

रोड बंद करण्याचे ठिकाण – चिंबळी फाटा
पर्यायी मार्ग – चिंबळी – मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी-पुणे

आळंदीतील जे कर्मचारी कामानिमित्त आळंदीच्या बाहेर जात असतात त्यांना 6 तारखेपासून आळंदी पोलिसांकडून पास देण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करताना सोबत आधार कार्ड, ज्या कंपनीत कामाला आहे, त्या कंपनीचे ओळखपत्र, विद्यार्थी असल्यास कॉलेजचे ओळखपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.