Chinchwad : सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा – अण्णा बोदडे

स्वीप उपक्रमांतर्गत आयआयएमएस येथे मतदार जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज- सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला बहुसंख्येने मतदान करावे, असे आवाहन पिंपरी-चिचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले. देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मततदारजागृतीच्या प्रयत्नात सर्वांनी सहभागी व्हायला हवे आणि मतदानासाठी सज्ज व्हायला हवे, असेही बोदडे यावेळी म्हणाले.

चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, चिंचवड विधानसभा मतदार संघ यांच्या सहकार्याने स्वीप उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मतदार जनजागृती अभियानाला  मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाला संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे , अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस , यशस्वी अकॅडेमी फॉर स्किलचे शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. सुनीता पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ओंकार वाघ या विद्यार्थ्याने मतदारांनी घेण्याच्या शपथेचे वाचन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे प्रफुल्ल पुराणिक यांनी सांगितले की, मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने स्विप कार्यक्रम राबविला जातो, असे सांगत व्ही. व्ही. पॅट मशीनच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच यावेळी व्ही व्ही पॅट मशीनच्या माहितीबाबतचा तसेच मतदानाचे महत्व याबाबत निवडणूक आयोगाने तयार केलेले माहितीपट दाखिवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.