Pune News: आजपासून महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’च्या छायाचित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज: राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या बहुचर्चित कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) पदयात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रात ही यात्रा दोन आठवडे चालली. त्यातील क्षणचित्रांचा आढावा घेणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन 8 , 9 आणि 10 डिसेंबर या तीन दिवशी बालगंधर्व कलादालनात भरणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

Talegaon News: गो नी दांडेकर उद्यानाचा उद्या नामकरण सोहळा

श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 18 व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत या तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (दि. 8) दुपारी 4 वाजता बालगंधर्व कलादालनात ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते, आमदार संग्राम थोपटे व आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताहाचे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, असे सेवा कर्तव्य त्याग सप्ताह समितीतर्फे कळवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.