Talegaon News: गो नी दांडेकर उद्यानाचा उद्या नामकरण सोहळा

एमपीसी न्यूज : तळेगाव शहरातील आनंदनगर येथे उभारण्यात आलेल्या उद्यानाचा नामकरण सोहळा दिनांक 8 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

सदर उद्यानास महाराष्ट्र भूषण गो.नी. दांडेकर उद्यान नामकरण करण्यात आले असून सदर कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्री सलील कुलकर्णी व श्री संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू काही संगीत रजनीचा कार्यक्रम तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Pune News: महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी कोंढव्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

तरी, तमाम रसिक श्रोत्यांनी आयुष्यावर बोलू काही या संगीत रजनीचा आनंद घेण्यासाठी आनंद नगर गार्डन येथे सायंकाळी पाच वाजता राहावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.