Pimpri news : पिंपरी-चिंचवड शहरात तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना अवघ्या 4 तासात अटक

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवार, 6 डिसेंबर 2022 रोजी तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना (Pimpri news) अवघ्या 4 तासात अटक करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

याप्रकरणी शाहरुख शेख, वय 29 वर्षे, रा. गुलाबनगर, दापोडी, मोहम्मद अलवी, वय 26 वर्षे, रा. सटवाई मंदिराशेजारी, पवार वस्ती, दापोडी व फारुख शेख, रा. गुलाबनगर, दापोडी या आरोपींना अटक करण्यात आले आहे.

मंगळवार, 6 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी पत्रा शेड झोपडपट्टी, रेल्वे लाईन जवळ, लिंक रोड चिंचवड येथे एका रिक्षा मधून आलेल्या तीन इसमांनी हवेत फायरिंग केल्याबाबत गुन्हे नियंत्रण कक्ष येथून माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे दरोडाकृती पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व आमलदार या सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवले यांनी पथकास गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अधिक माहिती घेतली असता सदर गुन्ह्यात शाहरुख शेख आरोपी असल्याचे कळाले.

आरोपी  शाहरुख शेख दापोडी येथे राहत असल्याने त्या परिसरात त्याचा शोध घेत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत, विनोद वीर व सुमीत देवकर यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे त्याला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे या गुन्ह्याच्या बाबत अधिक चौकशी केला (Pimpri News)  असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार शोएब अलवी, सागर मलिक उर्फ मायकल व फारुख शेख यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली. आरोपी शाहरुख शेख याच्या मदतीने त्याची इतर पाहिजे दोन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी मोहम्मद अलवी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तसेच फारुख शेख याला गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

Pune News: महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी कोंढव्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपी शाहरुख शेख व मोहम्मद अलवी हे दोघे दापोडी येथे एकाच परिसरात असल्याने ते मित्र आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता, शाहरुख शेख याचा भाऊ इरफान शेख याचा गुन्ह्यात नाव घेतल्याचा शाहरुख यास राग होता. याबाबत त्याने मोहम्मद अलवी याला सांगितले होते. या कारणावरून 6 डिसेंबर 2022 रोजी शाहरुख शेख मोहम्मद अलवी व त्यांचा मित्र सागर मलिक उर्फ मायकल असे तिघे विभागीय शोएबल बी याचा रिक्षा मधून पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड येथे फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीस शाहरुख शेख यांनी त्याचा भाऊ इरफान शेख यांचे गुन्ह्यात नाव का घेतले असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी मोहम्मद अलवी याने शेजारील किराणा स्टोअर मध्ये असलेल्या इसमास सीसीटीव्ही बंद कर अशी धमकी देऊन, त्यास मारहाण करून, शिवीगाळ केली व गोळीबार केला. त्यादरम्यान तेथे फारूक शेख आला व त्याने देखील फिर्यादीस शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर त्यांनी रिक्षा मधून लिंक रोड, भाट नगर व बौद्ध नगर येथे जाऊन पुन्हा हवेत गोळीबार केला.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक विवेक पाटील, सहाय्य्क पोलीस आयुक्त (गुन्हे) पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Pimpri News) दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व अंमलदार युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर,  युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदुरकर व अंमलदार युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड व अंमलदार तसेच गुंडा विरोधी पथकाचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक हरिष माने व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.