Chikhali News : संतपीठामध्ये विद्युत विषयक कामासाठी चार कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणा-या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे  येथे आवश्यक विद्युत विषयक कामे करण्यासाठी 3 कोटी 99  लाख रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली.

निगडी दापोडी या मार्गावरील सेवा रस्त्याचे आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यात येणार आहे.  यासाठी  1 कोटी 87 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.  प्रभाग क्र. 10 मधील विद्यानगर, दत्तनगर आणि  इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा करणे आणि उर्वरित ठिकाणी जलनि:सारण विषयक कामे करण्यासाठी 32 लाख रुपये खर्च होणार आहे.  प्रभाग क्र. 32 मधील परिसरात ममतानगर, जयमालानगर, मधुबन, सांगवी व उर्वरीत भागामध्ये ड्रेनेज लाईनची व चेंबरची देखभाल दुरुस्ती करण्याकामी 21 लाख रुपये खर्च होणार आहे.

प्रभाग क्र.16 मधील रावेत व किवळे मधील मनपा शाळा इमारतींची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी 24 लाख रुपये इतका खर्च होणार आहे.  प्रभाग क्र. 18 मधील लक्ष्मीनगर, माणिक कॉलनी परिसरातील रस्ते आणि इतर रस्ते दुरूस्ती रक्कम रुपये 25 लाख इतका खर्च होणार आहे.  प्रभाग क्र.18 मधील काशीधाम मंगल कार्यालय आणि इतर परिसरातील रस्ते दुरूस्ती 26  लाख रुपये, प्रभाग क्र. 27 रहाटणीमध्ये ड्रेनेज लाईन, चेंबर्सची देखभाल दुरुस्ती आणि इतर आकस्मिकपणे उद्भवणारी जलनि:सारण विषयक कामे करण्यासाठी 26  लाख रुपये, प्रभाग क्र. 10 मध्ये आवश्यकतेनुसार जलनि:सारण नलिका सुधारणा विषयक कामे करणे आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 33 लाख रुपये, प्रभाग क्र.14 मधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे आणि उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी 59  लाख रुपये खर्च येणार आहे.

प्रभाग क्र. 25 मधील वाकड, ताथवडे व पुनावळे परिसरातील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च होणार आहेत.  क क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफ सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने 1 कोटी 29 लाख रुपये, प्रभाग क्र.2 चिखली परिसरात राडारोडा उचलण्यासाठी 70 लाख रुपये  खर्च होणार आहेत.

चिखली मोरेवस्ती प्रभाग क्र.1 अंतर्गत संतपीठ येथे आवश्यक विद्युत विषयक कामे 3 कोटी 99  लाख रुपये, प्रभाग क्र.6 मध्ये लांडगेवस्ती, सदगुरुनगर, चक्रपाणी वसाहत, महादेवनगर व परिसरामध्ये पावसाळी गटरची सुधारणा करण्यासाठी 21 लाख रूपये, सांगवी-किवळे या रस्त्यावर सेवा वाहिन्यांचे चरांची दुरुस्ती करण्यासाठी 81 लाख 65 हजार रुपये, निगडी-दापोडी या रस्त्यावर सेवा वाहिन्यांच्या चरांची दुरुस्ती करण्यासाठी 96  लाख रुपये, प्रभाग क्र.4 दिघी-बोपखेल मधील आय टु आर अंतर्गत ताब्यात आलेल्या जागेत बहुउद्देशीय इमारत बांधणे व जागा विकसित करण्यासाठी 3 कोटी रुपये, सांगवी-किवळे या बीआरटीएस कॉरीडॉर वरील डेडीकेटेड लेनची व बस स्टॉपची दुरुस्ती अनुषंगिक कामे करण्यासाठी  98  लाख रुपये खर्च होणार आहेत.   या  खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.