Today’s Horoscope 20 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  बुधवार. …. ​दि​.  20 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार –१३ प. चांगला दिवस.
  • आज विशेष – बुधाष्टमी.
  • राहू काळ – दुपारी १२.००  ते ०१.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रेवती १२.३६ पर्यंत, नंतर अश्विनी.
  • चंद्र राशी – मीन १२.३६ पर्यंत नंतर मेष.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
 व्यवसायात तुम्ही केलेल्या पूर्वीच्या कष्टांना यश मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही अग्रेसर राहाल. तुमची ध्येयाकडे वेगाने वाटचाल होणार आहे. कुणालाही मोफत सल्ले वाटप मात्र करू नका.

वृषभ – ( शुभ रंग – आकाशी)
आज तुम्हाला काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. जमाखर्चाचा मेळ बसवणे आज थोडेसे अवघड जाणार आहे.

मिथुन – ( शुभ रंग- मरून)
 पैसा येण्याचे मार्ग प्रशस्त होणार आहेत. भावनेच्या भरात कोणाला शब्द दिले असतील तर ते पाळू शकाल. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा)
आज स्वावलंबन हेच महत्त्वाचे असेल. अधिकार वापरण्याची योग्य संधी चालून येणार आहे. मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद संभवतात. काही नव्या संधी चालून येतील, तरी हातचे सोडण्यापूर्वी विचार करावा.

सिंह – ( शुभ रंग- पिस्ता)
उद्योग व्यवसायात तुमचा प्रगतिरथ वेगवान राहील. नोकरदारांनी आज साहेबांच्या फार मागेपुढे करण्यापेक्षा सहकार्‍यांशी मिळून-मिसळून राहणे हिताचे राहील.

कन्या – ( शुभ रंग – लाल )
आज काही अप्रिय घटना तुमच्या मनास बेचैन करतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळताना नाकीनऊ येतील. वाद विवादात तटस्थतेचे धोरण स्वीकारा. वैवाहिक जीवनात असलेले मतभेद फार ताणू नका.

तूळ – (शुभ रंग- मोरपंखी)
आर्थिक स्थिती उत्तम असून आज तुमचा मूड ही चांगला असेल. आज सहकुटुंब चैन कराल. मुलांचे लाड पुरवाल. ज्यात काही कळत नाही त्यात मात्र उगीच डोकं घालू नका.

वृश्चिक – ( शुभ रंग- क्रीम)
उद्योग-धंद्यात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. भागीदारीच्या व्यवसायात देण्या घेण्यात पारदर्शकता ठेवा. कामाच्या व्यापात आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

धनु – (शुभ रंग- जांभळा)
उच्च शिक्षितांची ध्येय साध्य होतील. नवोदित कलाकारांना चांगल्या प्रोजेक्टचे प्रस्ताव येतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसून येईल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील.

मकर – ( शुभ रंग – केशरी)
कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज मातोश्री कडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. कलाकारांना कामे शोधावी लागतील.

कुंभ –  ( शुभ रंग – गुलाबी)
आज भावंडांमध्ये सामंजस्य राहील गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागतील. आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाणार आहे.
संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. आनंदी दिवस.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. हौस मौज जरूर करा पण आपल्या मर्यादा सांभाळा. वाणीत मृदुता ठेवल्यास सगळा दिवस छान जाईल. घशाचे विकार असतील तर काळजी घ्यावी.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.