Pune Murder News: दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तडीपार गुंडांची निर्घृण हत्या

Externed goon brutually killed within the limits of Dattawadi Police Station in Pune.

एमपीसी न्यूज- शहरातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तडीपार गुंडाची चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. रविवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. अक्षय किरतकिरवे (वय 36) असे हत्या करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. टोळीच्या वर्चस्ववादातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार घडला आहे दत्तवाडी परिसरात दहशतीचे वातावरण आहे. 

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अक्षय किरतकिरवे हा सराईत गुंड आहे. त्याच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच त्याला शहरातून तडीपार केले होते. तरीसुद्धा तडीपारी आदेशाचा भंग करत तो शहरात वावरत होता. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास अक्षय किरतकिरवे हा दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हात्रे पूल परिसरात होता. यावेळी चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार करत निर्घृण खून केला. त्यानंतर हे टोळके पसार झाले.

दरम्यान पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दिवसाढवळ्या हा खून झाल्याने दत्तवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तडीपार गुंडाचा दिवसाढवळ्या अशाप्रकारे खून झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. एकीकडे शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त मोक्का कायद्याचा वापर करीत आहेत. तर दुसरीकडे सराईत गुंड शहरात अशा प्रकारे दहशत माजवत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.