Pune News : अग्निशमन केंद्रात फायरमनच्या नियुक्त्या

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्र आणि त्यांच्या नियंत्रणातील 13 उप अग्निशमन केंद्रामध्ये कंत्राटी पद्धतीने फायरमनच्या नियुक्त्या करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहीती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, कंत्राटी स्वरुपात फायरमनची नियुक्ती करण्यासाठी सहासष्ट लाख दहा हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित संस्थेशी करार करण्यात येईल. शासनाच्या नियमानुसार संबंधित संस्थेच्या वतीने महागाई भत्ता आणि वेतन दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.