America News: ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असताना व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार

Firing outside the White House during Donald Trump's press conference गुप्तचर यंत्रणांनी त्वरीत कारवाई करत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तीला गोळी लागली आहे.

एमपीसी न्यूज- व्हाइट हाऊस बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची माहिती दिली आहे. व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. गुप्तचर यंत्रणांनी त्वरीत कारवाई करत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तीला गोळी लागली आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी गोळीबाराची घटना घडली तेव्हा ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु होती. त्यावेळी त्यांनीच उपस्थितांना याची माहिती दिली. दरम्यान, काही वेळासाठी ट्रम्प यांना पोडियमवरुन खाली उतरण्यास सांगितले होते.


गोळीबाराच्या घटनेला अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, 17 वा मार्ग आणि पेन्सिल्वेनिया एव्हेन्यू येथे झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्याचाही समावेश होता. गोळीबारानंतर गुप्तचर यंत्रणांनी त्वरीत कारवाई केल्याबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.