HRD Minister Took Admission: ‘या’ राज्याचे शिक्षणमंत्री घेताहेत अकरावीत अ‍ॅडमिशन

Jharkhand HRD minister Jagarnath Mahto took admission for 11th कमी शिक्षणामुळे माझ्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे मी अकरावीत प्रवेश घेणार असल्याचे महतो यांनी म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – शिक्षण अवघे दहावी पास मात्र राज्याचे शिक्षणमंत्री पद या आमदाराकडे आहे. झारखंड राज्याचे शिक्षण मंत्री जगरनाथ महतो यांनी फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. मात्र, कमी शिक्षणामुळे माझ्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे मी अकरावीत प्रवेश घेणार असल्याचे महतो यांनी म्हटले आहे.

जगरनाथ महतो हे झारखंड मुक्ती मोर्चाचे डुमरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये ते शिक्षण मंत्री म्हणून काम करत आहेत. 53 वर्ष वय असलेल्या महतो यांनी दहावीनंतर शिक्षण थांबवले होते व पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी आता पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला असून अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे.

झारखंड राज्याचा शिक्षणमंत्री म्हणून काम करताना नेहमी माझ्या शिक्षणाबद्दल बोलले जात होते. मी फक्त दहावी पास असल्यामुळे माझ्यात अपराधीपाणाची भावना निर्माण होत होती. त्यामुळे मी पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे महतो यांनी म्हटले आहे.

दरम्यान महतो यांनी बोकारो, नवाडीह येथील देवी महतो इंटर कॉलेजच्या अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. त्यांनी शिक्षणमंत्री पद स्वीकारल्यानंतर दहावी पास व्यक्ती शिक्षण मंत्री पद कसे सांभाळणार असा प्रश्न सर्वजण उपस्थित करत होते.

महतो यांनी 1995 मध्ये शिक्षणाला राम राम ठोकून राजकारणात प्रवेश केला होता. विशेष म्हणजे महतो यांनी सहा वेळा जेलची हवा देखील खाल्ली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.