Wakad : आपसात भांडणे करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

Five arrested for violating public peace :आपसात भांडणे करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – आपसात भांडणे करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) सकाळी ताथवडे, नवले वस्ती येथील सार्वजनिक रोडवर घडला.

तेजस अर्जुन जगताप (वय 25, रा. रावेत), ओमकार चंद्रकांत सपकाळ (वय 21, रा. निगडी), वैभव विजय ननावरे (वय 20), रोहित प्रशांत दुसान (वय 20), अविनाश रमेश सोनवणे (वय 20, तिघे रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक गणेश भरत गिलबिले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ताथवडे, नवले वस्ती येथील सार्वजनिक रोडवर आरडा ओरडा करून आपसात मारामारी करीत होते.

सर्व आरोपी सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सर्व आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 160, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 112, 117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.