Chakan Crime News : जनावरांच्या बाजारातून कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणा-या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी चाकण मार्केटयार्डमधील जनावरांच्या बाजारात घडली.

नाथा प्रभू कोळेकर, रशिद महम्मद काझी, संतोष लक्ष्मण शिंदे, सलमान मुस्तफा शेख, गुलाब रसूल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश विजय चासकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चाकण येथे जनावरांचा बाजार भरतो. आरोपींनी त्यांच्याकडील चार वाहनांमध्ये या जनावरांच्या बाजारातून पाच भाकड गाई दोरीने बांधून भरल्या. त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. विनापरवाना, असुरक्षितपणे आणि क्रूरपणे जनावरांना वागणूक देऊन त्यांना कत्तलीसाठी नेताना आरोपी पोलिसांना आढळून आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.