Talegaon Dabhade : पल्स पोलिओ मोहिमेला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – देशभर रविवारी (दि. 27) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. तळेगाव दाभाडे शहरात देखील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेस तळेगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

पल्स पोलिओ डोस प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यास तळेगांव दाभाडे शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोटरी सिटीचे संस्थापक रो विलास काळोखे यांच्या शुभहस्ते तर लायन्स क्लब या ठिकाणी रोटरी सिटीचे अध्यक्ष रो राजेश गाडे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

रोटरी क्लब तर्फे दरवर्षी 115 देशामध्ये याचे आयोजन करण्यात येते तळेगाव शहरामध्ये 24 ठिकाणी तर ग्रामीण भागामध्ये 28 ठिकाणी पोलिओ डोसची केंद्रे ठेवण्यात आली होती अशी माहीती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ उमेष गुट्टे,डॉ राजेंद्र मोहिते डॉ दिनेश महालिंगे यांनी दिली

दीपक फल्ले रुग्ण कल्याण समितीचे सदस्य किरण ओसवाल, तानाजी मराठे हे प्रमुख उपस्थित होते
कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख संतोष शेळके ,संजय मेहता, सुरेश शेंडे प्रशांत आगलावे व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहकारी वर्गाने केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.