Pune News : पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सोहम मोडक यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोहम मोडक यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या मोडक सरांनी जीवशास्त्र रेण्विक गर्भविज्ञान, उतिसंवर्धन, जीव सुचना-विज्ञान इत्यादी शाखांमध्ये मोलाचे संशोधन केले आहे. पुणे विद्यापीठाचे नाव त्यांनी जगभरात आघाडीवर नेले तसेच आंतरराष्ट्रीय पातळीचे संशोधन प्रकल्प पुण्यात आणले.

त्यांनी डॉक्टरेट पूर्ण करून अमेरिका आणि युरोपमध्ये प्रख्यात विद्यापीठामध्ये संशोधन, अध्ययन आणि अध्यापन केले. 1979 मध्ये पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक पदावर ते रुजू झाले. त्यांचे बालपण नाशिक मध्ये गेले. त्यांनी हॉलीबॉल सारख्या मैदानी खेळांमध्ये प्रावीण्य मिळविले होते. संशोधनाबरोबरच काव्य आणि साहित्यामध्ये देखील ते रमून जात असत. अति उच्च पातळीवरील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.