Fort Lingana : बाल रणरागिनींनी केला किल्ले लिंगाणा सर

एमपीसी न्यूज : पुणे दुर्गजागर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत मोहिमेत मावळे व बालरणरागिणी यांनी चित्तथरारक असा किल्ले लिंगाणा (Fort Lingana) सर केला. महाडपासून इशान्य दिशेला सुमारे 16 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेत तोरणा व रायगड किल्ल्याच्या दरम्यान किल्ले लिंगाणा आहे. या मोहिमेत बाल मावळे सहभागी झाले होते. किल्ले लिंगाणा सर करताना 6 ते 9 वय वर्षाच्या तीन बाल रणरागिनींच्या चित्तथरारक प्रवास झाला.  

शिवकाळात या किल्ल्याचा कारागृह म्हणून उपयोग केला जात होता. अवघड अशा या दुर्गावर शत्रूंना कैदेत ठेवले जात होते. समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंच चढाईचा कठीण असा लिंगाणा किल्ला सर करणे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते.

Hinjawadi : मेगापोलीस स्पार्कलेटजवळ इलेक्ट्रिक केबलमध्ये स्पार्क होऊन लागली आग

गुरुवारी (दि. 3) दुर्गजागर प्रतिष्ठानचे संतोष जगताप, किरण थोरात, विशाल कदम, स्वप्निल कंद, आकाश कोहली व ओमकार चव्हाण या मोहिमेत सहभागी झालेल्या चिमुकल्या रणरागिणी आरूषी संतोष जगताप ( वय 7 वर्ष )लोणीकंद, स्वरा किरण थोरात ( वय 6 वर्ष )बुकेगाव , ज्ञानेश्वरी स्वप्निल कंद ( वय 9 वर्ष ) लोणीकंद, यांनी वडिलांसोबत अवघ्या 22 तासात लिंगाणा किल्ला सर केला.

या मोहीमेत सह्याद्रीपुत्र ट्रेकर्सचे (Fort Lingana) सोमनाथ शिंदे, राम धरपडे यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी आतापर्यंत 12 वेळा, तर दुर्गजागर प्रतिष्ठानला घेऊन 13 वेळा लिंगाणा किल्ला सर केला असल्याचे संतोष जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.