Hinjawadi : मेगापोलीस स्पार्कलेटजवळ इलेक्ट्रिक केबलमध्ये स्पार्क होऊन लागली आग

एमपीसी न्यूज : मेगापोलीस स्पार्कलेटजवळ इलेक्ट्रिक केबलमध्ये स्पार्क होऊन गवत व कचऱ्याला आग लागल्याची घटना काल (Hinjawadi) रात्री घडली. फार्माझिया पॉलिक्लिनिक या मेगापोलीस स्पार्कलेट गेट समोरील गटारातील केबलला स्पार्क झाला होता. त्याच्यामुळे आजूबाजूचे गवत आणि डम्पिंग मटेरियलने (कचरा) पेट घेतला व मोठी आग लागली.

याबाबत काल रात्री स्पार्कलेट सोसायटीच्या रहिवाश्यांनी फायर ब्रिगेडला वर्दी दिली. वर्दी मिळताच एमआयडीसी फायर ब्रिगेड हिंजवडी फेज 3 ची गाडी त्वरित रवाना होऊन (Hinjawadi) तेथे पोहोचली. कर्मचाऱ्यांनी बकेटच्या सहाय्याने तेथील आग विझवली. तब्बल अर्ध्या तासानंतर आग विझली.

Bhosri Crime : ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचे अपहरण करून लावली विल्हेवाट

उपचालक अधिकारी एस. डी. खडपकर, यंत्र चालक एम. एस. नाईक, यंत्र चालक एन. एस. सकपाळ, अग्निशामक विमोचक जी. डी. पवार व अग्निशामक विमोचक ए. एच. फरांदे या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.