Wakad Crime News : क्रीप्टोकरंसी स्वस्तात खरेदी करण्याच्या मोहात पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रीप्टोकरंसी पाच रुपये कमी दराने देण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून एका व्यक्तीची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री सव्वासात वाजता ताथवडे येथील एका हॉटेलवर घडली.

शुभम हवा (वय 22, रा. लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुष्पराज रामविलास गुप्ता (वय 49, रा. लोणी काळभोर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा फिर्यादी यांचा मित्र विजय वाघमारे याच्याशी असलेल्या जुन्या ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादी यांना युएसडीटी डॉलर ही क्रीप्टोकरंसी पाच रुपये दराने स्वस्त देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांना ताथवडे येथील एका हॉटेलवर बोलावले. तिथे फिर्यादी यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.