Thergaon : विश्वासाने नेलेली थार गाडी परत न करता फसवणूक

एमपीसी न्यूज – विश्वासाने नेलेली थार गाडी परत न करता व्यक्तीची 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून थेरगाव (Thergaon) येथे घडला आहे.

PMC : पुणे महानगरपालिका 25 तृतीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने करणार नियुक्ती

विजय महादू केदारी (वय 47, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष गायकवाड (रा. चऱ्होली, पुणे) आणि 6261531470 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केदारी यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यातून त्यांची आरोपी आशिष याच्यासोबत ओळख झाली. आशिष याने केदारी यांचा विश्वास संपादन करून त्यांना ताम्हिणी घाटात 10 एकर जमीन आली आहे. ती फार स्वस्तात मिळणार आहे, असे सांगून शेतकऱ्यांशी बोलायला जावे लागत असल्याचे कारण सांगून केदारी यांची 15 लाख रुपये किमतीची थार गाडी (एमएच 14/जेएक्स 9086) नेली.

ती गाडी केदारी यांना परत न देता तिचा अपघात झाला असल्याचे केदारी यांना खोटे सांगितले. केदारी यांनी गाडी देण्याबाबत वारंवार विचारले असता आशिष याने केदारी यांची गाडी दिघी येथे गहाण ठेवल्याचे सांगितले. गाडी सोडवून देतो, तोपर्यंत गाडीचे हप्ते भरतो असे आशिष याने सांगितले.

दरम्यान फिर्यादी यांना मुंबई मधील शोरूम मधून फोन आला. त्यावेळी त्यांना त्यांची गाडी एका अनोळखी व्यक्तीकडे असल्याचे समजले. त्या व्यक्तीने देखील फिर्यादींना त्यांची गाडी देण्यासाठी वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Thergaon) वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.