Pune : पवना धरणग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी; धरणग्रस्तांना मिळणार चार एकर जागा

एमपीसी न्यूज – पवना धरणग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी (Pune) आहे. पवना धरण तयार करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात आल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना चार एकर जागा देण्याचा निर्णय आज (शुक्रवारी, दि. 19) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना 2 एकर व शासकीय जागा उपलब्ध होईल तेथे 2 एकर जमीन अशी एकूण 4 एकर जमीन देण्यात येणार आहे.

याबैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गितांजली शिर्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, अधिक्षक अभियंता सौ जगताप, पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता अशोक शेटे, शाखा अभियंता अहिरे, उपविभागीय अधिकारी मावळ  बागडे, तहसीलदार विक्रम देशमुख, पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात 1972 साली पवना धरण बांधण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात आल्या होत्या अनेक वर्षापासून शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. परंतु, निर्णय अनेक वर्ष होत नव्हता. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांबरोबर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Thergaon : विश्वासाने नेलेली थार गाडी परत न करता फसवणूक

यामध्ये पाहून बाधित शेतकऱ्यांना 2 एकर व शासकीय जागा उपलब्ध होईल (Pune) तेथे 2 एकर जमीन अशी एकूण 4 एकर जमीन देण्याचा निर्णय पवनाबाधित शेतकरी यांच्या उपस्थितीत एकमताने घेण्यात आला.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सर्व शेतकरी यांना विश्वासात घेऊन पवना धरण परिसर वगळता देण्यात येणारी दोन एकर जागा सर्वे करून उपलब्ध करून द्यावी अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

यावेळी सर्व बाधित शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार श्रीरंग आप्पा बारणे व माजी मंत्री बाळा भेगडे यांचे आभार मानून जल्लोष व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.