Free Hand to Army: चीनला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी भारतीय सेनेला ‘फ्री हँड’

सैन्य प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्र्यांकडून सूचना Free Hand to Army: Defence Minister allows Indian Army to respond to Chinese Army 'as is'

एमपीसी न्यूज – चीनच्या कोणत्याही कारवाईस सामोरे जाण्यासाठी भारतीय सैनिक आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गोळीबार करू शकणार आहेत. एलएसीवर चीनकडून होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराला सामोरे जाण्यासाठी सरकारने सैन्याला शस्त्रे व दारुगोळा वापरण्यास परवानगी दिली आहे. म्हणजेच आता भारतीय सैनिक चीनच्या सीमेवर झालेल्या करारास बांधील राहणार नाही.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीन सीमेवर सुरू असलेल्या गतिरोधात तीन सैन्य प्रमुख आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत संरक्षणमंत्र्यांनी चीन सीमेवर उद्भवणार्‍या कोणत्याही परिस्थितीत सैनिकांना कोणतीही कारवाई करण्याची परवानगी दिली आहे.

संरक्षणमंत्री उद्या (सोमवार) पासून तीन दिवसांच्या रशिया दौर्‍यावर आहेत. त्यापूर्वी चीन सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात ही महत्त्वाची बैठक होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात हिंसक संघर्षानंतर 15/16 जूनच्या रात्री भारतीय सैन्याने गोळीबार केला नसल्याचे आढळले कारण 1996 मध्ये भारत आणि चीनमध्ये एलएसीवर गोळीबार आणि तोफखान्याचा वापर न करण्याचा करार झाला होता. हा करार झाल्यापासून कोणत्याही परिस्थितीत भारतीय सैनिक गोळीबार करू शकले नाहीत, पण आता असे दिसत आहे की भारत सरकारने चीनच्या सीमेवर शांतता राखण्यासाठी या कराराला गुंडाळून ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

_MPC_DIR_MPU_II

चीनशी झालेले करार  झाले आहेत की नाही हे स्त्रोतांनी स्पष्ट केले नाही, परंतु असे सांगितले जात आहे की, चीनने गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षात कोणताही करार मान्य केला आहे. अशा परिस्थितीत भारतीय सैन्याला कोणत्याही प्रकारचा सूड उगवण्यास पूर्ण परवानगी देण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे भारत आणि चीनने सीमेवर शांतता राखण्यासाठी 1996 मध्ये एक ‘सैन्य क्षेत्र’ करार केला होता, त्याअंतर्गत एलएसीच्या दोन किलोमीटरच्या परिघामध्ये दोन्ही देशांच्या सैन्याने कोणत्याही प्रकारचा गोळीबार आणि तोफ डागणे थांबविले होते. पण 16 जून रोजी रात्री चीनने भारतीय सैनिकांच्या गस्ती पथकाला गलवान खोऱ्यात ओलीस बनवून ठेवले आणि नंतर बिहार रेजिमेंटच्या कमांडिंग ऑफिसरची कट-कारस्थानाने हत्या केली, त्यामुळे चीनशी झालेल्या कराराबाबत पुनर्विचार करण्यास भारत सरकारला भाग पाडले.

मात्र सीओच्या हत्येनंतर बिहार रेजिमेंट आणि तोफखान्याच्या तुकडीने एलएसी ओलांडून चीनची तात्पुरती निरीक्षण चौकी पेटविली आणि मोठ्या संख्येने चीनी सैनिक मारले किंवा जखमी केले. या जवाबी हल्ल्यात कोणत्याही भारतीय शिपायाने गोळीबार केला नाही. चिनी छावणीत त्यांनी फक्त काठ्या, दांडकी आणि रॉडच्या सहाय्याने हल्ला केला.

पण गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर भारत सरकारने सैनिकांना गोळीबार करण्याची परवानगी दिली आहे. परंतु चिनी सैन्याने पुन्हा कुरापत काढली तर निर्माण होणाऱ्या विशेष परिस्थितीतच ही सूट असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.