Pune : महाराष्ट्र दिनापासून पुणे जिल्ह्यात ‘कचरामुक्त अभियान’ राबवणार

एमपीसी न्यूज : जिल्हा परिषदेने यंदा घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. (Pune) गावातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे समोर येते. त्यामुळे केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी घटकांसाठी ग्रामीण पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून 1 मेपासून सर्व गावांमध्ये कचरामुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार गावात स्वच्छता राखणे बंधनकारक आहे. मात्र, गावा-गावांतील सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यांचे मोठे- मोठे ढीग साचले आहेत. यामुळे अनेक गावांमधील सार्वजनिक ठिकाणांना उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे गावातील आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता धोक्यात आली आहे. त्यामुळे गाव कचरामुक्त करण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी गावपातळीवर करण्यात येणार आहे. त्यामध्ये जनजागृती, कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई यांचा समावेश असून यासंदर्भात ग्रामसभेत किंवा मासिक सभेत याची माहिती ग्रामपंचायतीने द्यावी.

Wakad : व्हिडीओ लाईक करून पैसे कमावण्याचा मोह संगणक अभियंत्याला नडला; 19 लाखांची झाली फसवणूक

कचरामुक्त अभियानासाठी स्वच्छ भारत मिशन, 15 वा वित्त आयोग, मनरेगा, राष्ट्रीय बायोगॅस व खतवस्थापन कार्यक्रम, जिल्हा वार्षिक योजना, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व, (Pune) नावीण्यपूर्ण योजना, लोकप्रतिनिधींचा विकास निधी, ग्रामपंचायत निधी व जिल्हा परिषद निधीतून खर्च करावा, निधी खर्च करताना त्या-त्या योजनेशी निगडित शासन निर्णयात नमूद अटी, शर्तीचे व निकषांचे पालन करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.