Dighi News : फौजी असल्याचे सांगून व्यावसायिकाची 42 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज फौजी असल्याचे सांगून दुचाकी विकण्याचा बहाणा करत आळंदीतील एका व्यावसायिकाला 42 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. (Dighi News) हा प्रकार 17 डिसेंबर 2022ते आजपर्यंत या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी विलास धोंडू चव्हाण (वय 54 रा. चोवीसवाडी, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.7) फिर्याद दिली असून अजय मगर, विलास सोडक (पुर्ण माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehu road : कॅनडाच्या व्हिजाच्या बहाण्याने साडे सात लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना माबाईलवर फोन आला, त्यावर आरोपीने सांगितले की, मेरा नाम अजय मगर है,मैं फौजी हूं, अभी नाशिक के दवळाली कॅम्प में (Dighi News) ड्यूटी कर रहा हूं, मुझे मेरी अक्टीव्हा (एमएच 12 क्यू के 8619) बेचनी है. असे सांगून त्याने त्याचे व मिलीटरी कॅन्टीन तसेच गाडीचे फोटो टाकले. तसेच त्याने गाडी खरेदी करायची असेल तर एजन्ट विलास सोडक याचा 8917679725 हा मोबाईल नेंबर देऊन गाडी आर्मी पोस्टाने येईल सांगितले.

त्यासाठी त्याने फोन पे वर 42 हजार 550 रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र कोणतीच गाडी न देता व पैसे न परत करता फिर्यादीची फसवणूक केली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.