Dehu road : कॅनडाच्या व्हिजाच्या बहाण्याने साडे सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज कॅनडा येथील वर्क व्हिजा मिळवून देतो (Dehu road) म्हणून दोघांनी पती-पत्नीची फसवणूक केली आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2022 पासून आजपर्यंत देहुरोड व पुणे कॅम्प येथे घडला आहे.

याप्रकऱणी 26 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिला आरोपी व वनराज उर्फ पुष्कराज यश भाटे (रा. कात्रज) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Hinjawadi fraud : पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलेची आठ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पतीला आरोपींनी आम्ही कॅनडा येथील वर्क व्हिजा मिळवून देऊ असे सांगितले. त्यसाठी वेळोवेळी फिर्यादी व त्यांच्या (Dehu road) पतीकडून 7 लाख 58 हजार रुपये घेतले. अकरा महिने उलटून गेले तरी व्हिजा न मिळाल्याने फिर्यादी यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस याचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.