Chinchwad News : गडकरी करंडक मराठी एकांकिका स्पर्धा 11 फेब्रुवारीपासून

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि श्रीमती चंदकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित 23 वी कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 11 ते 13 फेब्रुवारी 2022 या कालावधीत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे ही स्पर्धा पार पडेल.

सातत्याने तेवीस वर्षे चालत असलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून दरवर्षीच वेगवेगळ्या ठिकाणांहून अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. याही वेळेस कोविड संदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांनुसार काळजी घेऊन स्पर्धा पार पडणार आहे.

स्पर्धेत कोणत्याही हौशी संघास, कंपनी, बँक कर्मचारी, महाविद्यालये यांना भाग घेता येऊ शकेल. 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरावयाचे असून 6 फेब्रुवारी, रविवारी लॉटस् काढण्यात येतील. एकूण 22 संघांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

स्पर्धेसंबंधी अधिक माहिती व प्रवेश अर्ज –

याबाबत माहितीसाठी किरण येवलेकर – 8830146951, सुहास जोशी – 9822244308, नरेंद्र आमले – 8237003953 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.