Pune News: आरोग्य विभागातील ३१ डॉक्‍टरांना मुदतवाढ

एमपीसी न्यूज: महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणार्या तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, कोराना विषाणूची तिसरी लाट येण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना म्हणून वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचार्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी आयुष विभागासाठी बीएएमएस आणि बीएचएमएस असे प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी, दोन दंतशल्यचिकित्सक आणि बीएएमएस पदवी संपादन केलेल्या २५ अधिकारी अशा ३१ डॉक्‍टरांना स्थायी समितीने मुदतवाढ दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.