Ganeshotsav : पुण्यातही गणेशोत्सवात सत्तांतर नाटय; नरेंद्र मंडळाचा देखावा

एमपीसी न्यूज – कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा संपुर्ण राज्यात गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातील देखावे हे तर नेहमीच कुतुहलाचा विषय आहे. राज्यातील अनेक गणेशभक्त हे देखावे पाहण्यासाठी पुण्यात येत असतात.राज्यात नुकतेच झालेले नाटकीय घडामोडींनी रंगलेले सत्तातर हा तर अवघ्या देशात चर्चेचा विषय झाला होता, आणि तोच धागा पकडून पुण्यातील एका मंडळाने चक्क राज्यातील या सत्तांतर नाट्याचा देखावा तयार केला आहे.

पुण्यातील नरेंद्र मंडळाने या सत्तांतराचा देखावा सादर करण्याचे ठरविले आहे.त्यामुळे हा आता शहरात गणेशोत्सवाआधीच चर्चेचा विषय झाला आहे. नरेंद्र मंडळ यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यातील सत्ता मंथनाचा देखावा सादर करणार आहे.

सध्या या देखाव्याची अंतिम तयारी प्रसिध्द कलाकार सतीश तारु यांच्या कारखान्यात चालू आहे. देखाव्यासाठी उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या हुबेहुब मुर्ती साकारण्यात आल्या आहेत. हा देखावा गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्र ठरेल, असा विश्वास मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.