Pune : मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेस 6 कोटी 11 लाख नफा

एमपीसी न्यूज- मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेस चालू आर्थिक वर्षात 6 कोटी 11 लाख नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली.

बँकेची 86 वी सर्वसाधारण सभा आझम कँम्पस असेंब्ली हॉल येथे आज, रविवारी झाली. या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. बॅंकेकडे 567 कोटी 60 लाख रुपये ठेवी असून 345 कोटी 72 लाख रुपये कर्जवाटप केले आहे. बँकेचा एन.पी. ए.8.45 टक्के आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात 6 कोटी 11 लाख रुपये फायदा झाला आहे.

पुण्यात मुख्यालय असलेल्या मुस्लिम को- ऑप बँकेच्या 27 शाखा असून 24 शाखाच्या विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे. मोबाईल बँकिंग अॅप, आरटीजीएस- एनईएफटी गो लाईव्ह या डिजीटल बँकिंग सेवा देण्यात आल्या असून भावी काळात नेट बँकिंग, परकीय चलन विनिमय सेवा दिल्या जाणार आहेत. बँकेचे संचालक, सभासद,कर्मचारी या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते, सभेनंतर ‘ सहकार आणि बॅंकिंग प्रशिक्षण कार्यक्रम ‘ घेण्यात आला.

बँकेचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार ,सचिव डॉ. हारुन सय्यद यांनी अहवाल मांडला त्याला सभासदांनी मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.