Pune : टिंडरवरती फेक अकाउंट बनवून लग्नाच्या आमिषाने तरुणीची 36 हजारांना फसवणूक
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून टिंडरवरती फेक अकाऊंटच्या मदतीने तरुणीला लुटणा-या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना ऑगस्ट 2018 ते सप्टेंबर 2018 या दरम्यान एरंडवणा येथे घडली.
सुबोजित अभिजित दासगुप्ता (वय 29, रा.नागपूर),असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोजित याने टिंडर या सोशल नेटवर्किंग साईटवर करण ओबेरॉय नावाचे फेक अकाउंट फिर्यादी तरुणीस विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी 36 हजार रुपये पेटीएम व बँकेच्या खात्यावर मागून घेतले. त्यानंतर तिला 10 हजार रुपये मागितले व ते न दिल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी सुबोजित याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.