Ghorawadi : नोकरीच्या शोधात आलेल्या महिलेला रेल्वेची धडक

एमपीसी न्यूज- नोकरीच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या महिलेचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला. ही घटना तळेगाव ते घोरावडी दरम्यान किलोमीटर 159/25 जवळ सोमवारी (दि.8) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

वृषाली विवेक घाटकर (वय 26, रा. चिखली प्राधिकरण, पुणे) असे रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

लोहमार्ग पोलीस हवालदार संजय तोडमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली घाटकर या मूळच्या वसई पश्चिम, पालघर इथे राहायला असून त्यांच्या माहेरी चिखली प्राधिकरण पुणे येथे राहात होत्या. त्यांना नोकरीची गरज होती. त्या करिता सोमवारी सकाळी घरातून नोकरीच्या शोधात निघाल्या होत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव ते घोरावडी दरम्यान किलोमीटर 159/25 जवळ रेल्वेची धडक लागल्याने घाटकर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस हवालदार संजय तोडमल व प्रियांका नाईक यांनी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.