Hinjawadi News: बंद घरातून 16 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – बंद घरातून चोरट्यांनी तब्बल सव्वा तीन लाखांचे 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरले आहेत. हा प्रकार वाकड येथील भगवान नगर येथे 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत घडला आहे.

Pune News: जिल्हा प्रशासनाकडून 500 आपत्ती मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने शनिवारी (दि.10)फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे घर बंद असताना घरात प्रवेश करत चोरट्यांनी कपाटातील 16 तोळे 3 ग्रॅम वजनाचे 3 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.